मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे आज भूमिपूजन

 


 

                 बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता  आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे शुभहस्ते मॉडेल डिग्री कॉलेज परिसर, अजिंठा रोड, ग्राम-बिरसिंगपूर, बुलढाणा येथे संपन्न होणार आहे. 

 

 भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्राचे पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील), वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्राचे सहपालकमंत्री संजय सावकारे व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर तसेच आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, नगरपरिषद अध्यक्ष पूजा संजय गायकवाड, बिरसिंगपूर सरपंच वैशाली संजय शिंदे व विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

 

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याला सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व मॉडेल डिग्री कॉलेज, बुलढाणाचे मानद संचालक डॉ.ए.आर. म्हळसने यांनी केले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन