शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन; स्वाधार योजनेचाही लाभ मिळणार

 


बुलढाणा दि.27 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील एकूण १७ शासकीय वसतीगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शालेय विभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० जून २०२६ तर इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ जुलै २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने HMAS पोर्टल या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागेअभावी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, तरी त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वसतीगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंचलितपणे स्वाधार योजनेसाठी वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतीगृह प्रवेश अर्ज भरणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज भरलेला नाही, त्यांच्यासाठी स्वाधार योजनेचा स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसून अशा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहपाल यांच्याशी संपर्क साधून वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी