महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ; पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा दि.8 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य पिके तसेच वाणिज्य पिके (कापूस) सन २०२६-२७ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिके आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके गटांचे अर्ज, प्रमाणित बियाणे वितरण तसेच बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) या घटकांसाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन बियाणे या घटकांतर्गत ऑनलाईन अर्ज करावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्जांची निवड करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलढाणा श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या