डाक विभागाचा वार्षिक सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

 


बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह येथे डाक विभागाचा वार्षिक सत्कार समारंभ 2025-26 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच डाक विभागात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा डाक विभागाचे अधीक्षक श्री. गणेश आंभोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागाचे डाक निदेशक डॉ. सुधीर जाखेरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या समर्पित सेवाभावाची प्रशंसा केली. बुलडाणा डाक विभागाने वित्तीय वर्ष 2025-26 मधील निर्धारित उद्दिष्टे 100 टक्के पूर्ण करून यशस्वी कामगिरी कायम राखल्याचे नमूद करण्यात आले.

समारंभादरम्यान कर्मचाऱ्यांनी मागील वर्षातील कार्यप्रवास आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. अधीक्षक श्री. गणेश आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या नवकल्पना आणि उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

डॉ. सुधीर जाखेरे यांनी विभागाची भावी दिशा, आव्हाने आणि संधी याबाबत मार्गदर्शन करत बुलडाणा डाक विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. भविष्यातही अशाच उत्कृष्ट कार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कचरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश निकम, सहाय्यक अधीक्षक, बुलडाणा उपविभाग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डाक विभागातील कर्मचारी व ग्रामीण डाक सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या