बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 12 (जिमाका) :  कृषी यांत्रिकीकरण (राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण, यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण) योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

 

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांच्या पेरणीत सुलभता आणणे, बियाण्याची बचत करणे तसेच उत्पादन वाढविणे या उद्देशाने बी.बी.एफ. पेरणी यंत्राचा कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत समावेश करण्यात आला आहे.

 

या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. ट्रॅक्टर ३५ बीएचपी व त्यावरील क्षमतेसाठी बी.बी.एफ. पेरणी यंत्र खरेदीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति यंत्र ५५ हजार रुपये किंवा यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे. तर सर्वसाधारण व मोठ्या शेतकऱ्यांना प्रति यंत्र ४४ हजार रुपये किंवा यंत्राच्या किमतीच्या ४० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

 

या योजनेची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे सहायक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन