“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाभर एनसीडी तपासणी शिबिरांचे यशस्वी आयोजन
बुलढाणा, दि.30 (जिमाका) : “माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत जिल्हाभर असंसर्गजन्य रोग
(NCD) तपासणी शिबिरांचे व्यापक व यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामीण भागातील
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा उपक्रम मुख्य कार्यकारी
अधिकारी गुलाब खरात यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. शिबिरांमध्ये नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅनिमिया,
ईसीजी, कर्करोग तसेच सिकल सेल तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून
त्यांना आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.
किशोरवयीन मुलींमध्ये HPV लसीकरणाबाबत
जनजागृती व समुपदेशन करण्यात आले असून लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. उन्हाळ्याच्या
पार्श्वभूमीवर उष्माघात (Heat Stroke) प्रतिबंधासाठी आवश्यक सूचना देत नागरिकांमध्ये
जनजागृती करण्यात आली.
विविध तालुक्यांत शिबिरांचे
आयोजन
चिखली तालुका : प्राथमिक आरोग्य
केंद्र अंत्री खेडेकर, एकालारा तसेच उपकेंद्र मंगरूळ नवघरे आणि धोत्रा नाईक येथे शिबिरे
आयोजित करण्यात आली.
बुलढाणा तालुका : प्राथमिक
आरोग्य केंद्र रायपूर, वरवंड, पाडळी, हातेडी तसेच त्यांच्या अंतर्गत शिरपूर, दुधा,
आम जांभ, आम पेठ, आम सावली, कोलवड, भडगाव, पिंपळगाव सराई, भादोला, पांगरी, दहिद बु.
आणि मसला बु. येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय शेगाव, खामगाव, देऊळगाव राजा,
सिंदखेडराजा आणि इतर तालुक्यांमध्येही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन
शिबिरांची पाहणी केली. या उपक्रमात वैद्यकीय
अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहभाग
नोंदवत नागरिकांना आरोग्य तपासणीसह योग्य सल्ला व मार्गदर्शन दिले.
अभियानाची वैशिष्ट्ये : असंसर्गजन्य
रोगांचे (NCD) लवकर निदान व उपचार, सिकल सेल व ईसीजी तपासणी सुविधा, HPV लसीकरणाबाबत जनजागृती व समुपदेशन,
उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅनिमिया व कर्करोग तपासणी, गरोदर माता आरोग्य तपासणी व मार्गदर्शन,
उष्माघात प्रतिबंधासाठी जनजागृती, ग्रामीण स्तरावर आरोग्य सेवा अधिक सुलभ.
या अभियानामुळे नागरिकांमध्ये
असंसर्गजन्य आजारांविषयी जागरूकता वाढत असून लवकर निदान आणि वेळेवर उपचाराला चालना
मिळत आहे. “माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियान ग्रामीण भागात आरोग्यदायी जीवनशैली निर्माण
करण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
000000
Comments
Post a Comment