धार्मीक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टीक अन्न सेवा सुविधा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार
बुलढाणा, दि. 29 (जिमाका): केंद्र
सरकारच्या फुड स्ट्रिट योजनेअंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी
येथे फुड स्ट्रिट हबला केंद्र सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दोन्हीही धार्मीक स्थळी प्रत्येकी
1 कोटी या प्रमाणे 2 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीन उपलब्ध करुन दिल्या
जाणार आहे. या फुड स्ट्रिट हब सेंटर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार
आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या
संयुक्त विद्यमाने हि सेवा देशांतर्गत 100 ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थामुळे होणारे आजार,
अन्नातुन होणारी विषबाधा रोखण्यासाठी अन्न हाताळणीची सुरक्षीत मानके देशभर लागु करण्यात
आली आहे. त्यानुसार केंद्रिय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण
यांच्या वतीने देशभरात 100 फुड स्ट्रिट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत
विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संत नगरी शेगांव येथे 1 कोटी रुपये खर्चुन आधुनिक
स्वच्छ आणि “आरोग्यदायी” स्वच्छ
फुड स्ट्रिट विकसीत केल्या जाणार आहे. असेच फुड स्ट्रिट हब साई बाबा च्या शिर्डीतही
उभारल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील
दोन्ही धार्मीक स्थळांवर हे फुड स्ट्रिट हब विकसीत करण्याला मान्यता दिली आहे.
त्यामुळे विदर्भाच्या पंढरीत येणाऱ्या संत गजानन
महाराजांच्या भक्तांना तसेच साईबाबांच्या भक्तांना शिर्डीत दर्जेदार आणि पौष्टीक अन्न
सेवा या हब च्या माध्यमातुन मिळणार आहे. शिवाय लघु व्यवसायीक विक्रेत्यांना रोजगाराची
चालना मिळणार आहे. लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या महाराष्ट्रातील शेगांव आणि
शिर्डी येथे फुड स्ट्रिट हब मंजुर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रिय
आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहेत.
00000
Comments
Post a Comment