अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा, दि. 4 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अंतर्गत येणाऱ्या Akola, Washim व Buldhana जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 लीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रवेश अर्ज विनामूल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालय तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये उपलब्ध आहेत. पालकांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता किंवा कोणाच्याही माध्यमातून अर्ज न घेता संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अर्ज प्राप्त करून सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 मे 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :

·         विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.

·         सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.

·         पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असावे.

·         इयत्ता 1 लीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पूर्ण असावे.

·         अर्जासोबत पालकांचे संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक.

·         आदिम जमातीतील तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

·         पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत.

·         विद्यार्थ्यांच्या आधारकार्डाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक.

·         एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर शाळा बदलता येणार नाही.

·         अपूर्ण कागदपत्रे किंवा खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालय किंवा जवळच्या आश्रमशाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या