पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर
बुलढाणा दि.19 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी पाणी
पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे
पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
ढासाळवाडी येथे 690 पशुधन व 1 हजार 510 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 35 हजार
900 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता
टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात
यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर
नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी
प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment