देऊळगाव राजा येथील शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश सुरू; 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा दि.29 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल के. आर. सोनवाळ यांनी केले आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षण तत्त्वानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, ओबीसी आणि अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्रता राहणार आहे. शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी संबंधित वसतीगृहात जमा करणे आवश्यक राहील.

शालेय अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी ७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 11 वी व 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 असून पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी 31 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहाशी संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या