बंजारा बहुल समिती स्थापन; इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले

 


बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या विविध विकास कामांसाठी बंजारा बहुल बुलढाणा जिल्ह्यासाठी बंजारा बहुल समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भात मा. कार्यासन अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई यांनी पत्र क्र. संकिर्ण-२०२६/सं.क्र.२३/योजना-५ दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी समितीसाठी आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी आपला बायोडाटा, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification) आदी आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे १५ दिवसांच्या आत तात्काळ सादर करावेत. प्राप्त झालेल्या परिपूर्ण प्रस्तावांची शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना