मत्स्यखाद्य पुरवठादारांना दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील जिवंत प्रजनक मत्स्यसाठ्यासाठी मत्स्यखाद्य खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये शेंगदाणा ढेप व पॅलेटेड खाद्याचा समावेश असून, त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील इच्छुक मत्स्यखाद्य पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

इच्छुक पुरवठादारांनी आपल्या मत्स्यखाद्याचे दरपत्रक सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बस स्टँड समोर, धाड रोड, बुलढाणा येथे दिनांक ०६ जुलै २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) बुलढाणा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या