वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ : बुलढाणा राज्यात सहावा, अकोला विभागात प्रथम

 


 

बुलढाणा,दि.27 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ अंतर्गत National Tuberculosis Elimination Program (NTEP) कार्यप्रदर्शनाच्या राज्यस्तरीय मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुलढाणा जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी तर अकोला विभागात बुलढाणा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून विभागात अग्रस्थान मिळवले आहे.

 

राज्यस्तरीय गुणांकनात अवघ्या एका गुणामुळे पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान हुकले असले, तरी बुलढाणा जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे, अकोला विभागात बुलढाणा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून विभागात अग्रस्थान मिळवले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा सातत्याने राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवत असून, ही सातत्यपूर्ण प्रगती जिल्ह्याच्या सक्षम नियोजनाची साक्ष देणारी आहे.

 

केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बुलढाणा जिल्ह्याने राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या मानांकनात अग्रस्थान मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सातत्यपूर्ण व परिणामकारक प्रयत्न करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आढावा बैठका घेऊन प्रभावी नियोजन राबविण्यात आले. विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी व्यक्त केली.

 

जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, क्षयरोग कार्यक्रमातील कर्मचारी व संबंधित यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. भविष्यात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी आणखी जोमाने कार्य करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या