महात्मा बसवेश्वर सामाजिक समता, नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा: दि, 05 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५–२६ या वर्षासाठी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता (शिवा) पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार तसेच क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कलात्मक समाजप्रबोधन, साहित्यिक कार्य, समाजसेवा तसेच सामाजिक संघटनात्मक कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक व संबंधित सामाजिक संस्थांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रबोधन तसेच आर्थिक कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्यिक व सामाजिक संस्थांना सन २०२५–२६ या वर्षासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारासाठी पुरुष अर्जदारांची किमान वयोमर्यादा ५० वर्षे तर महिलांसाठी किमान ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच सामाजिक संस्थांनी संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र व्यक्ती व संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पुरस्कारासाठीचे प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण बुलढाणा मा. श्री. मनोज मेरत यांनी केले आहे.

 

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर