राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले संत गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन
Ø संत गजानन महाराज संस्थान, शेगाव मंदिर परिसराची
केली पाहणी
बुलडाणा, दि. 25 (जिमाका): भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री
गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री
प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर
निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित
होते.
प्रारंभी
संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने महामहिम राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे औक्षण
करून स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती महोदयांनी संत श्री गजानन महाराज यांच्या
समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदीर परिसराची माहिती घेत पाहणी केली.
यानंतर
राष्ट्रपती महोदयांचे राष्ट्रीय आरोग्य मेळावा मुख्य कार्यक्रमस्थळी प्रस्थान झाले.
०००००






Comments
Post a Comment