नवजात बालकाच्या पुनर्वसनासाठी रक्तसंबंधातील नातेवाईकांना आवाहन; 30 दिवसांत संस्थेशी संपर्क करा

 



बुलडाणा, (जिमाका) दि. 17 :  मानसिक रुग्ण असलेल्या आईपासून जन्मलेल्या नवजात बालकाच्या पुनर्वसनासाठी रक्तसंबंधातील नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधितांनी 30 दिवसांच्या आत संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

बालक नामे रोहण याचा जन्म होताच, त्याची आई रुपाली प्रशांत लोंडे मानसिक रुग्ण असल्याने सेवा संकल्प, पळसखेड सपकाळ (ता. चिखली) यांच्या मार्फत बालकाला दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी बाल कल्याण समिती, बुलढाणा यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार बालकाला यशोधाम -दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया), बुलढाणा येथे दाखल करण्यात आले असून, दि. 5 नोव्हेंबर 2025 पासून बालक संस्थेच्या देखरेखीखाली आहे.

दरम्यान, बालकाची आई रुपाली प्रशांत लोंडे हि दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी निधन पावल्याची नोंद आहे. तसेच, अद्यापपर्यंत बालकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी कोणतेही नातेवाईक पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर, बालकाच्या पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. बालकाचे कोणी रक्तसंबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी 30 दिवसांच्या आत यशोधाम -दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड (इंडिया), खामगाव रोड, सेंट जोसेफ स्कूल जवळ, सुंदरखेड, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा येथे किंवा सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर जाधव (9552206503) यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या