जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या मेळाव्यात २०० उमेदवारांना जागीच नोकरी; ५५० जणांची प्राथमिक निवड

 




बुलढाणा: दिनांक 5 (जिमाका): बुलढाणा जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव येथे 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एकूण ३३ नामांकित कंपन्यांनी या ठिकाणी १७०० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ५५० जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर २०० उमेदवारांना जागीच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, मिळालेल्या अनुभवातून भविष्यात स्वतःचे उद्योग सुरू करून उद्योजक बनले पाहिजे. बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपचे संचालक जुमले यांनी यावेळी शिकाऊ उमेदवारी योजनेचे महत्त्व समजावून दिले.

माऊली ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आमची संस्था जिल्ह्यातील तरुणांना मदत करण्यासाठी आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवण्यासाठी नेहमीच तयार आहे. प्राचार्य डॉ. जाधव यांनीही यावेळी महाविद्यालयाच्या सामाजिक भूमिकेबद्दल माहिती दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग ऑफिसर तुषार बढे, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या