जिल्हा युवा पुरस्कार: 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रीत
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हास्तर युवा पुरस्कार सन 2024-25 या वर्षाकरीता अर्ज
मागविण्यात आले असून इच्छुकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. राज्याच्या युवा धोरण 2012 नुसार जिल्हास्तरावर युवक आणि युवती तसेच संस्थेला
पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा
संचलानालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरणानुसार जिल्ह्यातील युवांनी
व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी
त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी देण्यात
येत असतो. पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात
येतो. त्याअनुषंगाने मुल्यांकनासह व पात्रतेचे
निकष पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी कार्यालयातुन अर्ज प्राप्त
करुन आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करावा. तसेच युवक - युवतीचे
पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे
पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत
दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलडाणा
येथे सादर करावा. अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा,
अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी कळविले आहे.
युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष :
युवक किंवा युवतीचे वय पुरस्कार वर्षातील
1 एप्रिल रोजी 13 वर्ष पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. (तसा पूरावा जोडावा),
जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य
असावे. (दाखला जोडावा), पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. पुरस्कार
मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे
आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो, इत्यादी),
अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत
राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने
केलेले असावे.(तसे हमीपत्र जोडावे), एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती
राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी
तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र
राहणार नाही. अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक राहील.
संस्थांसाठी पात्रता निकष : पुरस्कार संस्थेस
विभागुन दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे
आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो, इत्यादी),
अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार
असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम
1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी
झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने
केलेले असावे.(तसे हमीपत्र जोडावे), एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था
राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे), अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा
पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन)
देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन : युवा व युवा
विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि.1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत
गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी
ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्यात साधन संपती जतन व संवर्धन तसेच
राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित
जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग, इ. बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतीक,
कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभृन, व्यसनमुक्ती
तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. तसेच राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन
देणारे कार्य, नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक
समस्या, महिला सक्षमीकरण अशा बाबीचा मुल्यांकनासाठी विचार केल्या जाईल.
000000
Comments
Post a Comment