सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश
बुलढाणा,
(जिमाका)दि. २६ : सैलानी बाबा
दर्गा येथील ११९ व्या उरूस महोत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या महोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता,
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतूक मार्गांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
२५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत हे निर्बंध लागू राहतील.
दिनांक 25 फेब्रुवारी ते 12 मार्च 2026 या कालावधीत महोत्सव
साजरा होत असून, 2 मार्च रोजी होळी उत्सवात नारळांची होळी, 8 मार्च रोजी संदल मिरवणूक
आणि 12 मार्च रोजी फातेहाखानीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे
4 ते 5 लाख भाविक सैलानी येथे येणार आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या
विनंतीनुसार जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांनी जिल्हा वाहतूक मार्ग क्रमांक 26 वरील वाहतुकीचे
वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
पर्यायी मार्ग
:
1) सध्याचा मार्ग
: रायपूर – पिंपळगाव सराई – सैलानी – ढासाळवाडी
– दुधा.
पर्यायी मार्ग
: रायपूर – मातला – केसापूर – माळवंडी – दुधा
2) सध्याचा मार्ग : दुधा – घाटनांद्रा – ढासाळवाडी – सैलानी
– पिंपळगाव सराई
पर्यायी
मार्ग : दुधा – माळवंडी
– केसापूर – मातला – रायपूर
या कालावधीत
एस.टी. बसेस, जड वाहतूक तसेच खाजगी वाहतूक यांना पर्यायी मार्गाचा वापर करणे बंधनकारक
राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 131 अन्वये
योग्य ती कारवाई करण्यात येईल. महोत्सव काळात भाविकांनी प्रशासन व पोलीस विभागाच्या
सूचनांचे पालन करावे, असे आदेशद्वारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000
Comments
Post a Comment