वीर परिवार सहायता योजना अंतर्गत प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर संपन्न

 



बुलढाणा, दि. 12 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील प्रशिक्षण केंद्रात आज सकाळी ११.०० वाजता वीर परिवार सहायता योजना अंतर्गत ‘अधिकार मित्र’ यांचे प्रशिक्षण तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले.

सदर कार्यक्रम एन. एन. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा आणि स्कवॉडर्न लीडर रुपाली सरोदे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांना वीर परिवार सहायता योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी मा. एन. एन. पाटील, स्कवॉडर्न लीडर रुपाली सरोदे, अॅड. राहुल दाभाडे आणि अॅड. संजय इंगळे यांनी उपस्थितांना विविध कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले. शिबिरात माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या हक्क, योजना लाभ प्रक्रिया आणि कायदेशीर सहाय्य याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या