खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; बुलढाण्यात १६ फेब्रुवारीला प्लेसमेंट ड्राइव्ह

 


बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सोमवार, दि. १६.०२.२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे होणार आहे.

सदर प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये Mahindra & Mahindra, Pune यांच्यासह नामांकित उद्योगसंस्थांनी त्यांच्या रिक्त पदांची अधिसूचना केली असून कंपनी प्रतिनिधींकडून गरजू व नोकरी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

१० वी, १२ वी, आयटीआय व पदवीधर अशा शैक्षणिक पात्रता असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त पदांसाठी मुलाखत देण्याची संधी असेल.

या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ग.प्र. बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा अडचणीसंदर्भात कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक (०७२६२-२४२३४२) वर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या