खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

 


बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : खामगाव शहरात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने त्या दिवशी भरविण्यात येणारा गुरुवारचा आठवडी बाजार रद्द करून पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी संदर्भीय पत्राद्वारे कळविले होते की, जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. त्याच दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा, १८६२ च्या कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारीचा आठवडी बाजार रद्द करून तो पुढील दिवशी भरविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या