जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृतीसाठी प्रचार-प्रसार मोहीम राबविणार

 

बुलढाणा, दि. 12 फेब्रुवारी: महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने दि. 20 डिसेंबर 2013 रोजी अधिनियम 2013 लागू केला आहे. भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ठ व अमानुष प्रथांमुळे समाजाचे मानसिक, सामाजिक व आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात घेऊन हा कायदा जारी करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. अश्रनि-2022/प्र.क्र.145/सामासु, मंत्रालय मुंबई, दि. 28 जून 2022 अन्वये जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीत जादूटोणा विरोधी कायद्याबाबत व्यापक जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध करण्याबाबतही सूचनाही करण्यात आल्या.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जादूटोणा, नरबळी व इतर अमानुष प्रथांविरोधात जागरूक राहून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे. समाजाचे मानसिक स्वास्थ्य जपणे व शोषण-छळ रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या