घरगुती उपचारांची शिदोरी: 'आजीबाईचा बटवा' सत्रातून आरोग्याचा मंत्र
घरगुती उपचारांची शिदोरी: 'आजीबाईचा बटवा' सत्रातून आरोग्याचा मंत्र
बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : शेगाव येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळाव्या'मध्ये 'आजीबाईचा बटवा' या विशेष सत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या सत्रात वैद्य अपश्चिम मालेगावकर यांनी उपस्थितांना घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतीची सखोल माहिती दिली.
आपल्या सभोवतालच्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगताना मालेगावकर यांनी स्पष्ट केले की, निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात. केवळ अंगणातील झाडेच नव्हे, तर स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमध्येही औषधी गुणधर्म दडलेले आहेत. कोणत्या आजारावर या वस्तूंचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन त्यांनी केले. किरकोळ आजारांसाठी रासायनिक औषधांऐवजी नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करून आरोग्य कसे सुदृढ ठेवावे, याचे मोलाचे सल्ले या मेळाव्यात देण्यात आले. या उपक्रमामुळे विस्मरणात जात असलेल्या पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
0000000000
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment