मलकापूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

 


 

बुलढाणा, दि. 27 (जिमाका): माहे जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभाग यांच्या आदेश दिनांक 17 फेब्रुवारी 2026 अन्वये प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मलकापूर तालुक्यातील 33  ग्रामपंचायतींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.

 

> समाविष्ट ग्रामपंचायती याप्रमाणे : दसरखेड, नरवेल, विवरा, भानगुरा, तिघ्रा, म्हैसवाडी, वाघोळा, दुधलगाव खुर्द, चिखली, निबारी, घिर्णी, वाघुड, माकनेर, वडोदा, धरणगाव, भालेगाव, कुंड खुर्द, कुंड बु., तालसवाडा, तांदलवाडी, हिंगणाकाझी, शिराढोण, भाडगणी, पिंपळखुटा बु., दाताळा, वरखेड, लासुरा, खामखेड, जांभुळधाबा, वडजी, दुधलगाव बु., लोणवडी व हरणखेड.

 

प्रारूप प्रभाग रचना तयार करणे: तहसिलदार यांनी गुगल अर्थ नकाशांवर सुपर इम्पोज करून गावनिहाय नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीनंतर प्रभाग पाडणे व सीमा निश्चित 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तपासणी 5 मार्च, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर 11 मार्च, जिल्हाधिकाऱ्यांची तपासणी व राज्य निवडणूक आयोगाकडे सादरीकरण 17 मार्च करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून 23 मार्चपर्यंत आवश्यक दुरुस्तीसह मान्यता दिली जाईल. दुरुस्त्या अंतर्भूत करून समितीकडून 30 मार्च 2026 रोजी प्रारूप प्रभाग रचना मंजूर केली जाईल.

 

हरकती व सूचना मागविणे : प्रारूप प्रभाग रचनेला नमुना ‘ब’ मध्ये व्यापक प्रसिद्धी देऊन 7 एप्रिल 2026  पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 13 एप्रिल 2026 आहे. प्राप्त हरकती 16 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करून 21 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

 

प्रभाग रचना अंतिम करणे : उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्तावांची तपासणी करून जिल्हाधिकारी 28 एप्रिल 2026 रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर 4 मे 2026 रोजी नमुना ‘अ’ मध्ये अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या