पालकमंत्री मकरंद पाटील शेगाव दौऱ्यावर; राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय आरोग्य मेळावास लावणार हजेरी
बुलढाणा, दि.
२४ (जिमाका): राज्याचे मदत
व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे बुधवार, दि. २५ फेब्रुवारी
२०२६ रोजी शेगांव जि. बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महामहिम राष्ट्रपतींच्या
प्रमुख उपस्थितीत शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा-2026 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
दौऱ्याचा याप्रमाणे: बुधवार दि. २५ फेब्रुवारी
रोजी सकाळी 9.30 वाजता शेगाव जि.बुलढाणा येथील
शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह येथून नियोजित हेलिपॅडकडे
रवाना व महामहिम राष्ट्रपती यांच्या स्वागताकरिता उपस्थिती. सकाळी 11.35 वाजता संत
श्री गजानन महाराज मंदिर, शेगांव या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या समवेत कार्यक्रमास
उपस्थिती. दुपारी 12.20 वाजता महामहिम राष्ट्रपती यांच्या समवेत आयुष मंत्रालय द्वारे
आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा - 2026 या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता कार्यक्रमानंतर महामहिम राष्ट्रपती
यांच्या समवेत शेगांव हॅलीपॅडकडे रवाना. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता कार्यक्रमानंतर
सोयीनुसार अकोला विमानतळाकडे रवाना.
000000
Comments
Post a Comment