जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धा कलावंतांची स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी श्रद्धांजली

 




बुलढाणा: दि, 05 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या वतीने स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्या सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्या दिवशी रात्री सहभागी कलावंतांनी शॅडो ॲक्टच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प बुलढाणा यांच्या कर्मचारी कलावंत संचाच्या वतीने हे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री असताना स्व. अजित पवार यांनी राज्यात अमलबजावणी केलेल्या विविध यशस्वी योजनांचे प्रासंगिक या शॅडो एक्ट च्या माध्यमातून करण्यात आले. तसेच विमान अपघाताच्या दुर्दैवी व दुःखद घटनेचा प्रसंग सुद्धा अतिशय संवेदनशीलतेने या कलावंतांनी उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभा केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले प्रकल्प अधिकारी, संदीप गवळी  व डॉ. राधा बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली सिद्धार्थ हिवाळे यांच्या संकल्पनेतून हा शॅडो एक्ट सादर करण्यात आला. यामध्ये सुनीता चित्ते, आशा खरे, लता तायडे, शालिनी मोरे (धाड), माया मोरे (तराडखेड), वैशाली गवई (भादोला), कुसुम हिवाळे (भादोला), रुपाली वानखेडे (डोंगर खंडाळा) या मुख्य कलावंतांसह बाल कलाकार स्वराज बर्डे यांनी अभिनय केला. त्यांच्या या भावनात्मक सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांचे डोळे सुद्धा पाणावले होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या