एमएसपी अंतर्गत कापूस खरेदी 27 फेब्रुवारीपर्यंत; शेतकऱ्यांना आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : चालू
पीक वर्ष सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत कापूस खरेदी करण्याची
अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
कपास
किसान ॲपवर नोंदणीकृत असलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी MSP चा लाभ घेण्यासाठी
ॲपद्वारे स्लॉट बुक करून 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत जवळच्या Cotton Corporation of
India (CCI) खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक
माहितीसाठी शाखा कार्यालय, अकोला येथील व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक 7507613563 वर
संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment