जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून ‘आपदा मित्र’ निवासी प्रशिक्षण युवक-युवतींना आपत्ती व्यवस्थापनाचे १२ दिवसांचे प्रशिक्षण
बुलढाणा, दि. ५ (जिमाका): राष्ट्रीय आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
बुलढाणा यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. हे निवासी प्रशिक्षण ९
फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अजिंक्य वैभव मंगल कार्यालय, कारंजा चौक,
बुलढाणा येथे संपन्न होणार आहे.
आपत्तीच्या
काळात स्थानिक पातळीवर त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देऊन जीवितहानी कमी करणे, हा
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील निवड
करण्यात आलेल्या तसेच इच्छुक युवक-युवतींना १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
१८
ते ४५ वयोगटातील शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक व महाविद्यालयीन
विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. यामध्ये प्रामुख्याने एन.एस.एस. (NSS), एन.सी.सी. (NCC), नेहरू युवा
केंद्र (NYK) चे विद्यार्थी, होमगार्ड, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, आशा वर्कर,
अंगणवाडी सेविका तसेच आपत्तीप्रवण गावातील ग्राम महसूल सहाय्यक यांचा
समावेश आहे. तसेच डॉक्टर, माजी सैनिक व
स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयोमर्यादा ५५ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
प्रशिक्षण
पूर्ण करणाऱ्या ‘आपदा मित्रां’ना शासनाकडून ३ वर्षांसाठी ५ लाख रुपयांचा अपघात विमा तसेच वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसाद संच (Emergency
Kit) देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, चहा-नाश्ता व जेवणाची
संपूर्ण व्यवस्था शासननियुक्त प्रशिक्षण संस्था मे. “आयटस” स्पोर्ट्स अँड सेफ्टी प्रा. लि. (इंडियन रेस्क्यू
अकॅडमी, पुणे) यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
सर्व
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी सकाळी १०
वाजता नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य असून, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व ओळखपत्र
सोबत आणणे आवश्यक आहे.
इच्छुक
उमेदवारांनी आपल्या संबंधित तहसील
कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी. अधिक
माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी श्री. संभाजी पवार, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याशी
किंवा मो. ७०२०४३५९५४ / ९०११७७७२२३
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment