शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर

 


बुलढाणा, (जिमाका), दि.18 : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बीअर बार विक्री दुकाने बंद अर्थात कोरडा दिवस (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई  करण्यात येईल, असे आदेशाव्दारे स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या