माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 


बुलढाणा, दि.09 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या अंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर पोलीस ग्राउंड समोरील प्रभा हॉल, बुलढाणा येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांना विविध कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांच्या अडचणी व प्रश्नांबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.

तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या