शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरु; 11 मार्चपर्यंत मुदत


बुलढाणा, दि. 27 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या पत्रानुसार, इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 मध्ये वरील योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. इयत्ता १२ वी नंतरचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच इतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 11 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावे. निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम व प्रसिद्ध 12 मार्च 2026 रोजी होईल. निवड यादीप्रमाणे प्रवेशाची अंतिम मुदत 20 मार्च 2026 राहिल. सदर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून पात्र विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या