जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

 



बुलढाणा, दि.20 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार हुशारी केसकर, संजीवनी मुफडे तसेच जिल्हा नाझर गजानन मोतेकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या समाजप्रबोधन, शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

0000 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या