रुपे ऑन द गो (एनसीएमसी) कार्डचे वितरण लवकरच; राज्य परिवहन सवलतीच्या तिकीटासाठी कार्ड अनिवार्य

 


बुलढाणा (जिमाका),दि.20 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागामार्फत सर्व सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांसाठी रुपे ऑन द गो (एनसीएमसी) सक्षम वैयक्तिक कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डमुळे सवलतीचे तिकीट, पास टॉप-अप आणि डिजिटल वॉलेट सुविधा एकाच माध्यमातून मिळणार आहेत.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, हे वैयक्तिक कार्ड असून त्यावर कार्डधारकाचे नाव व फोटो असेल. कार्ड अहस्तांतरणीय असेल. सवलतधारी तसेच सामान्य प्रवाशांना या कार्डचा वापर करता येईल. कार्डमध्ये सवलत सुविधा + ऑनलाईन वॉलेट + ऑफलाईन वॉलेट यांचा समावेश असेल.

तिकीट व वॉलेट सुविधा: रा.प. बसमधील सवलतीचे तिकीट काढण्यासाठी कार्ड अनिवार्य राहील, ऑनलाईन वॉलेट मध्ये मोबाईल, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे टॉप-अप करता येईल, आरक्षण (मोबाईल  अॅ प/पीओआरएस) व इतर व्यवहारांसाठी ऑनलाईन वॉलेटचा वापर शक्य, ऑनलाईन वॉलेटमधील रक्कम ऑफलाईन वॉलेटला ट्रान्सफर करता येईल,           बसमधील वाहकाद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकीटासाठी ऑफलाईन वॉलेट वापरले जाईल. सवलतीचे तिकीट घेण्यासाठी ऑफलाईन वॉलेटमध्ये अपेक्षित भाड्याइतकी शिल्लक आवश्यक.

नोंदणी व वितरण:  कार्ड नोंदणी/वितरण प्रक्रिया महामंडळाच्या 251 आगारांतील अधिकृत एजंट, सुमारे 335 वाहतूक नियंत्रण कक्ष, तसेच एन एस डी एल पेमेंट बँकेद्वारे नियुक्त 3000+ एजंट यांच्यामार्फत राबविण्यात येईल. तपशील परिशिष्ट ‘अ’ मध्ये देण्यात येणार आहे.

देखभाल शुल्क:  वॉलेट टॉप-अपवर 0.9% सुविधा शुल्क + वस्तू व सेवा कर आकारला जाईल, विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक व इतर सर्व पासेसचे टॉप-अप रु. 50/- च्या पटीत करणे आवश्यक, टॉप-अप सुविधा आगार/बसस्थानके, अधिकृत एजंट, संकेतस्थळ, मोबाईल अॅरप व वाहकाच्या ईटीआय मशीनद्वारे उपलब्ध, आगारहद्दीबाहेरील एजंटमार्फत सेवांसाठी अतिरिक्त शुल्क लागू राहील.

कार्ड किंमत

•नवीन नोंदणीकरिता  111 रुपये (सर्व करांसह), पूर्वीच्या स्मार्टकार्डधारकांनी जुने कार्ड जमा केल्यास 149 रुपये, कार्ड हरवले/खराब झाल्यास 199 रुपये (ऑफलाईन वॉलेटमधील शिल्लक परत मिळणार नाही), चुकीची छपाई/तांत्रिक दोष असल्यास विनामूल्य बदल.

सवलतींचा समावेश: या कार्डमध्ये शासनमान्य विविध सवलती व पास योजना समाविष्ट राहतील. त्यामध्ये शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी पास, दिव्यांग पास, जेष्ठ नागरिक/अमृत जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, तसेच विविध पुरस्कारार्थी व विशेष श्रेणीतील प्रवाशांच्या सवलतींचा समावेश आहे.त्यामुळे कार्ड वितरण सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर नोंदणी करून सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या