कुसुम अभियानाचा सखोल आढावा

 




बुलढाणा, दि. 11 (जिमाका): सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), पुणे कार्यालयाचे मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा विशेष दौरा करून ‘कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान’ तसेच आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेतला.

दौऱ्यादरम्यान डॉ. कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सहाय्यक संचालक, कुष्ठरोग कार्यालय येथे कुसुम अभियानाचा सखोल आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी बुलढाणा बसस्थानक येथे उभारण्यात आलेल्या कुसुम जनजागृती स्टॉलला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जनजागृती उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी या प्रयत्नांचे कौतुक केले. पुढे जिल्हा क्षयरोग कार्यालयास भेट देऊन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणीही त्यांनी केली.

या प्रसंगी डॉ. के. व्ही. राठोड (सहाय्यक संचालक, कुष्ठरोग), वैद्यकीय सहाय्यक तिटकारे, मदणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सांख्यिकी अधिकारी तसेच कुष्ठरोग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि राज्यस्तरीय पथक उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या