जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पाचा अनावरण
Ø
शिव जयंती सोहळा; शाहिरी जागर
बुलढाणा (जिमाका),दि.18 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती
पर्वावर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता
जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद
जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा शिल्प अनावरण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव
जाधव व रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या शिल्प अनावरण समारंभास सहपालक मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री ॲड. आकाश
फुंडकर , विधान परिषद सदस्य किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे तसेच विधानसभा
सदस्य चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड,श्वेताताई महाले, सिद्धार्थ खरात,
मनोज कायंदे, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अमरावती विभागीय आयुक्त
श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शिल्पकार प्रमोद कांबळे
, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांच्यासह विविध खातेप्रमुख प्रामुख्याने
उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय
इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा स्थापित करण्यात आलेली
होती. आता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या
संकल्पनेतून राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाची स्थापना केल्या जाणार
आहे. या निमित्ताने शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांचा शाहिरी जागर कार्यक्रम सुद्धा
आयोजित करण्यात आला आहे.
शिव जयंतीच्या औचित्यावर आयोजित या शिल्प
अनावरण सोहळ्यास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी आशिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील व बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता सुशील गुडधे यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment