१६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


बुलढाणा, दि. 10 (जिमाका): महिला व बालविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्र. मलोदि-२०१३/प्र.क्र.११/मकक, दि. ४ मार्च २०१३ अन्वये समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून त्वरित सोडवणूक व्हावी तसेच समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महिला लोकशाही दिन ही प्रभावी उपाययोजना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात येत आहे.

उपरोक्त शासन निर्णयानुसार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत मा. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

या महिला लोकशाही दिनामध्ये समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या तक्रारी असल्यास मा. उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावेत. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून महिलांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

विहित नमुन्यात नसलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले तक्रार अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर आणि चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने हे महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केले असून, पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी