सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरती परीक्षा १४ मार्च रोजी

 


बुलढाणा, दि. 12 (जिमाका): सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील सैनिक कल्याण विभाग व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतील सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

टिसीएस–आयओएन यांच्या मार्फत दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार असून, एकूण ७२ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक उमेदवारांनी परीक्षा वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

उमेदवारांनी प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र तसेच परीक्षेसंबंधित सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या