DIO BULDANA NEWS 31.07.2024

सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न बुलडाणा, दि. 31 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे तीस दिवसीय मोफत सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रमोद नामदास यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. प्रशिक्षणार्थीना मोबाईल टेलिफोनची मुलभूत तत्वे, मायक्रोप्रोसेसरची ओळख, सर्किट डायग्राम, सॉफ्टवेअर समस्या, स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये आदीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुण, तरुणी, पुरूष, महिला निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आरसेटी संचालक संदिप पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सहाय केले. 00000 भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 31 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे देण्य...