Posts

Showing posts from 2019

DIO BULDANA NEWS 10.12.2019

Image
राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथालयांना असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य ·          20 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रंथालयांनी अर्ज करावे बुलडाणा, दि.१० :   भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजने अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यानुसार सन 2019-20 साठी असमान निधी योजनेतंर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.               ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,  राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, ५०,६०, ७५, १००, १२५ आणि १५० वे महोत्सवी वर्ष असल्यास हे वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, रा...

DIO BULDANA NEWS 9.12.2019

संत जगनाडे महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन बुलडाणा, दि.९  – जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्ताने ८ डिसेंबर २०१९ रोजी अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे, नायब तहसिलदार श्री. अहीरे आदी उपस्थित होते.                                                                           *****    शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू व  तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत 31 डिसेंबर 201...

केंद्रीय पथकाने केली जिल्ह्यातील खरीप पिक नुकसानीची पाहणी

Image
खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा शिवारातील पिक पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद, जाणून घेतली परिस्थिती भादोला येथील शेतात नुकसानग्रस्त सोयाबीनच्या सुडीची केली पाहणी  बुलडाणा, दि. 23 :   अरबी समुद्रात गत काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या ‘क्यार’ व  ‘ महा’ या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथकाने आज जिल्ह्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. पथकाने खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.                                                                ...

DIO BULDANA NEWS 20.11.2019

Image
आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी *  तंबाखू खाण्याच्या दुष्परीणामांविषयी जनजागृती करावी बुलडाणा, दि. 20 :   शासन विविध आरोग्यविषयीच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनासाठी काम करते. आरोग्याच्या योजनांतून लाभार्थ्यांना उपचार, प्रतिबंधात्मक माहिती मिळते. अनेक योजनांमुळे संबंधित आजाराविषयी जनजागृती होवून नागरिकांकडून आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतात. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.   जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विविध आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) श्री. रामरामे, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.     जास्तीत जास्त लोकसंख्येची एचआयव्ही तपासणी करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, एचआयव्ही तपासणी करताना अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. जिल्ह्या...