Posts

Showing posts from May, 2017

maharashtra din news 1.5.17 DIO BULDANA

जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी राज्याचा 57 वा स्थापना दिवस थाटात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 1 हजार 528 कामे पूर्ण जिल्ह्यात 4 लक्ष 4 हजार 912 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम बुलडाणा, दि‍ .1 – राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.     महाराष्ट्र राज्याचा 5 7 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा  पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा  श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज श...