news 22.3.2017 dio buldana
पाण्याची बचत करून आपले कर्तव्य पार पाडा - जिल्हाधिकारी · जलजागृती सप्ताहाचा समारोप बुलडाणा , दि.22 : पावसाची अनियमितता, अनिर्बंध होणारा पाण्याचा उपसा, दरडोई वाढलेला पाण्याचा वापर यामुळे पाणी हा काटकसरीचा विषय बनला आहे. पाण्याचा जेवढा उपयोग आपण करतो, त्यापेक्षा जास्त पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज व्यक्त केली. जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आज बुलडाणा रेसीडेन्सी क्लब हॉटेलच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील , माधवराव मारशेटवार आदी उपस्थित होते. पाण्याची ब...