Posts

Showing posts from February, 2017

NEWS 23.2.2017 DIO BULDANA

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे निकाल जाहीर बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 गटांकरीता आणि पंचायत समित्यांच्या 120 गणांकरीता दि. 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी आज 23 फेब्रुवारी 2017 घेण्यात आली.  मतमोजणीची सुरूवात सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक तालुक्यात झाली. जिल्ह्यातील 60 जिल्हा परिषद गट व 120 पंचायत समिती गणांकरीता जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत .   जिल्हा परिषद :   तालुकानिहाय एकूण जागा, पक्षनिहाय बलाबल व जिल्हा परिषद सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार      बुलडाणा : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल – भाजप 0, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 3, शिवसेना 1 विजयी उमेदवार – देऊळघाट – दत्तात्रय श्रीराम लहाने (रा.काँ), सावळा – सविता गणेश बाहेकर (रा.काँ), साखळी – जयश्रीताई शेळके (काँग्रेस), मासरूळ – कमलबाई जालींदर बुधवत (शिवसेना), रायपूर – साधना दिलीप जाधव (काँग्रेस), धाड – सौदाग हीना मोहम्मद रिजवान (काँग्रेस)   चिखली : एकूण जागा 7, पक्षीय बलाबल – भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 0, ...

news 22.2.2017 dio buldana

 957 उमेदवारांच्या भाग्याचा आज निर्णय ·         185 टेबलवर मतमोजणी ·         597 कर्मचाऱ्यांची नियुक्ती ·         मतमोजणी होणार 209 फेऱ्या बुलडाणा, दि. 22 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यात मतदान झाले. जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी 574 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी 228 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच पंचायत समिती गणांसाठी जिल्ह्यात एकूण 1067 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 456 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. अशाप्रकारे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांसाठी 957 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 346 व पंचायत समिती गणांसाठी 611 उमेदवारांचा समावेश आहे. या 957 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय आज 23 फेब्रुवारी 2017 रोजी लागणार आहे.     मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 185 टेबलवर मतमोजणी हो...

news 9.2.2017,1 dio buldana

जिल्हा परिषदेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा बुलडाण्यात ·          11 ते 13 फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजन ·          आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिलाषा म्हात्रे व अजित लाकरा राहणार उपस्थित बुलडाणा, दि.9 - जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्‍हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अमरावती विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित उदघाटन समारंभास आंतरराष्‍ट्रीय खेळाडू    अभिलाषा म्‍हात्रे व अजित लाकरा यांची विशेष उपस्थिती या स्‍पर्धांचे मुख्‍य आकर्षण ठरणार आहे.     जिल्‍हा परिषदे अंतर्गत कर्मचा-यांच्‍या जिल्‍हा स्‍तरीय क्रीडा स्‍पर्धा या वर्षी आयोजीत करण्‍यात आल्‍या होत्‍या . या पार्श्‍वभूमीवर गेल्‍या    कि त्‍येक वर्षानंतर बुलडाणा जिल्‍ह्या ला विभागीय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍कृतीक मह...

news 9.2.2017 dio buldana

                                दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा -          ज.स. सहारीया ·          जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारीया आढावा ·          मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती देणारे फ्लेक्स ·          ट्रु वोटर ॲप्सचा उपयोग करावा ·          बॅलेट पेपरवरील ‘फॉन्ट साईज’ वाढविली ·          आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करावी बुलडाणा, दि.9 - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका पहिल्या टप्प्यात घेण्यात येत असून या निवडणूकीला 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे.   जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात...

news 3.2.16 dio buldana

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात अंदाजे 67.44 टक्के मतदान ·         मतदान सर्वत्र शांततेत ·         46 मतदान केंद्रांवर मतदान ·         23 हजार 551 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क बुलडाणा, दि‍ . 3 - विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीकरीता आज 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले . मतदान सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 46 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण पदवीधर पुरूष मतदार 26 हजार 666, स्त्री मतदार 8 हजार 253  मतदार आहेत. अशाप्रकारे एकूण मतदार जिल्ह्यात 34 हजार 919 आहेत. त्यापैकी 18 हजार 641 पुरूष मतदारांनी, तर 4 हजार 910 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे अंदाजे एकूण 23 हजार 551 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती उ...