Posts

Showing posts from December, 2016

news 28.12.2016 dio buldana

बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी विना रॉयल्टीची रेती घेवू नये ·         जिल्हाधिकारी यांचे आवाहन बुलडाणा, दि.28 - बांधकाम सुरू असलेल्या घर मालकांनी रॉयल्टी नसलेली रेती घेवू नये. रॉयल्टीची तपासणी महसूल यंत्रणेच्या संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी, तलाठी यांच्याकडून करावी. अशाप्रकारे रेती खरेदी थांबल्यास चोरीची रेती विक्री करणाऱ्यांची धाडस वाढणार नाही. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी रॉयल्टीची रेती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.     तहसीलदार यांनी बांधकाम सुरू असलेल्या स्थळी भेट देवून मालकाकडून रेती रॉयल्टीची घेत असल्याची खातरजमा करावी अन्यथा रेती जप्त करावी. रेती घाटांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सीसीटीव्हीचे एक महिन्याचे फुटेज सांभाळून ठेवावे. या फुटेजमध्ये रेतीची चोरी करीत असल्याचे आढळल्यास त्या इसमावर एफआयआर दाखल करावा. पोलीसांनी चोरीची रेती वाहतूक करणारी वाहने पकडून पेालीस स्टेशनला जमा करावे.  वाहन आरटीओ यांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ******* अपंग...

news 26.12.16 dio buldana

रब्बी हंगामासाठी विमा भरण्यास उरले काही दिवस.. ·         31 डिसेंबर 2016 अंतिम मुदत ·         शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा, दि.26 – पंतप्रधान पी‍क विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. योजनेत 31 डिसेंबर 2016 ही सहभागाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित या योजनेत सहभाग नोंदवून पिकांच्या नुकसानीचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.    कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जात असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहीत कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे. रब्बी हंगामासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मंडळ कार्यालय, तिसरा मजला, स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग, 65, मर्झबान रोड, मुंबई 400001 यांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हण...