शिवनी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी; ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी; समुपदेशनासह मोफत औषधोपचार
बुलढाणा, दि. 01 (जिमाका) : सेवा
संकल्प अभियानांतर्गत आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या घरापर्यंत
उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि. 30 सप्टेंबर रोजी गाव शिवनी येथे घरोघरी आरोग्य
तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आरोग्य पथकाने गावातील 30 वर्षांवरील नागरिकांची
तपासणी करून आवश्यकतेनुसार समुपदेशन, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली.
या
मोहिमेदरम्यान नागरिकांची उच्च रक्तदाब (BP), मधुमेह (Blood Sugar) तसेच मुख कर्करोगाची
पूर्वतपासणी करण्यात आली. यासोबतच इतर जुनाट तसेच हंगामी आजारांची लक्षणे तपासून नागरिकांना
आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
तपासणीमध्ये
आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी आवश्यकतेनुसार
संदर्भ सेवा देण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. नियमित आरोग्य
तपासणी, आजारांची लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य संस्थेशी संपर्क साधणे आणि निरोगी
जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले.
या
आरोग्य मोहिमेत डॉ. विशाल दाने, डॉ. विश्वजित त्रिकार व डॉ. विजय दुतवंडे, समुदाय आरोग्य
अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य
पथकाने सहभाग घेतला.
आदिवासी
व दुर्गम भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, तपासणी आणि उपचाराची सुविधा
त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात
येत आहेत. नागरिकांनी या आरोग्य सेवांचा लाभ घेऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी,
असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
0000

Comments
Post a Comment