तहसील कार्यालय लोणार येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचे वाटप 252 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा मिळाला लाभ
बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने आणि कालमर्यादेत उपलब्ध
करून देण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय, लोणार येथे ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रनेता
ते राष्ट्रपिता अभियान’ उत्साहात पार पडले. यावेळी 252 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात
आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय
अधिकारी प्रशांत सानप होते. तहसीलदार भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानांतर्गत
पोटखराब क्षेत्राचे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर करण्यासंदर्भातील आदेश, कालमर्यादेत
निकाली काढलेल्या विविध प्रकरणांचे अंतिम आदेश, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या
लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व विविध पत्रव्यवहार, शपथपत्रांचे वाटप करण्यात आले. नकल
विभागामार्फत नकल, आयुष्यमान भारत कार्ड तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ऑनलाइन
शिधापत्रिकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी नागरिकांना 12 पोटखराब क्षेत्र
वहिती आदेश, 13 आधार कार्ड, 21 शिधापत्रिका, 17 रहिवास व अधिवास दाखले, 25 आयुष्यमान
कार्ड, 43 संजय गांधी निराधार योजना मंजुरी आदेश, 37 नकल, 19 ऑनलाइन 7/12 उतारे,
36 उत्पन्नाचे दाखले आणि 29 विविध दाखले, अशा एकूण 252 लाभार्थ्यांना विविध शासकीय
सेवांचा लाभ देण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, लोणार
यांच्या सहकार्याने उपस्थित नागरिकांसाठी मोफत सार्वजनिक आरोग्य तपासणी शिबिराचेही
आयोजन करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीसह आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन
करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने
नागरिकांना त्याचा लाभ घेता आला.
00000
Comments
Post a Comment