चांडोळ येथे कृषी मालासाठी उपबाजार घोषित; बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५० गावांचा समावेश

 


            बुलढाणा, दि. 01 (जिमाका) :  कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा अंतर्गत सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे उपबाजार, चांडोळ येथे नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी उपबाजार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा यांनी चांडोळ येथे उपबाजार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाच्या संबंधित आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी चांडोळ येथील जागा बाजार क्षेत्रामधील नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी नियमनकारी उपबाजार म्हणून घोषित केली आहे.

या उपबाजारासाठी चांडोळ शिवारातील शासकीय ‘ई-वर्ग’ गट क्रमांक ६५९ मधील २.०० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जागेच्या चतु:सीमा पूर्वेस उर्वरित जमीन व डंपींग ग्राउंड, पश्चिमेस सरकारी संस्था (चांडोळ-घाट), उत्तरेस उर्वरित जमीन व एमएसईबी पॉवर हाऊस आणि दक्षिणेस गट क्रमांक ६५९ मधील उर्वरित जमीन अशी आहेत.

चांडोळ येथील या उपबाजार क्षेत्रात बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा, जांभरुण, पळसखेड भट, रुईखेड मायंबा, येळगाव, साखळी खु., हतेडी बु., डोमरूळ साखळी बु., तांदळवाडी, टाकळी, कोलवड, अंभी तलेली, इस्लामपूर, करडी, सागवान, पिंपळगाव स., आंभोडा, अटकल, नांद्राकोळी, उमाळा, उंबरखेड, बोरााखेड, चौथा, अजिसपूर, पांगरखेड, पाणीरी, देवपूर, मह, सर्व, शिरपूर, दूधा गिरडा, घुणगाव, सिंदखेड, सोयगाव, गोरेखनखेड, रुईखेड टेकाळे, मातला, पांग्रखेड, जुनुना, माळविहीर, सतगाव, धामणगाव, गुम्मी, सुरखेड, कुलमखेड, चिखला, तारखेड, सावळा, कुंकेफळ, आवळखेड, दोहित बु., हनवतखेड, भडगाव, कसापूर, दहिद बु., तारापूर, मोताळा, धानोरा, वडगाव, माळवा बु., माळवंडी, इस्लामपूर, पिंपरखेड, हसना खु., डाळखांबडी, जामठी, भादोला, मोताळा, मासरूळ, येरेखेड, पोथरी, ईरला, पाडळी, ढोरगाव, पळसखेड गा., शेगाव, बोरेखेड, धाड, पळसखेड नाईक, देऊळगाव, डोंगरखंडाळा, जांब, दत्तपूर, हरी, गोरेखनखेड, बोदेगाव, विरसिंगपूर, देऊळघाट, खेडी, सावळी, अंफळपूर, रायपूर, चांडोळ, हतेडी खु. आदी गावांचा समावेश आहे.

 

ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांमध्ये संबंधित हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी कळविले आहे

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या