‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत ६ ऑक्टोबरला कार्यशाळा निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. १ (जिमाका) : निवृत्तीवेतनविषयक सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) या मोबाईल ॲपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा येथे दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत राज्याचे प्रधान सचिव ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून सहभागींचे मार्गदर्शन करणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेस जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी योगेश धोंगडे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या