विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; स्वच्छता व किशोरवयीन आरोग्याबाबत मार्गदर्शन ; वळती येथे अनुसूचित जाती मुलांच्या शाळेत आरोग्य तपासणी शिबिर
बुलढाणा, दि. २ (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा अंतर्गत वळती येथील अनुसूचित जाती मुलांच्या
शाळेत आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांची
सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता
तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच किशोरवयीन आरोग्यविषयक
विविध बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. धनुर्वात प्रतिबंधक लसीकरणाचे
महत्त्व सांगून पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी
आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. आरोग्यविषयक
सवयी, स्वच्छता आणि आजारांपासून प्रतिबंध याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात
आली.
शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्होळा
येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी
उपस्थित होते.
0000

Comments
Post a Comment