Posts

DIO BULDANA NEWS 11.2.2020

शेगांव – बाळापूर रस्त्याच्या दुतर्फा 6 हजार झाडांचेच वृक्षारोपण बुलडाणा , दि.11  :   शेगांव-बाळापूर रस्त्याच्या दुतर्फा कामाच्या करारानुसार कंत्राटदाराने 6 हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. असा खुलासा ‘रस्ता कामाच्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रूपयांची देयके घातली घशात’ या वृत्ताचे खंडन करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रविण पुंडकर, सा. बां उपविभाग, खामगाव यांनी दिला आहे.   खुलाशानुसार, या रस्ता कामाच्या करारानुसार कंत्राटदाराने 6 हजार झाडे लावणे अपेक्षीत होते. त्यानुसार पुर्ण 6 हजार झाडे कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली होती. अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक प्रादुर्भावामुळे काही झाडे जगली नाहीत. आज रोजी 5500 झाडे जिवंत आहेत व सुस्थितीत आहे. त्यांची देखभाल ही कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.                          ...

DIO BULDANA NEWS 3.2.2020

Image
तक्रारींचा विहीत कालावधीत निपटारा करावा -            जिल्हाधिकारी ·          जिल्हास्तरीय लोकशाही दिन ·          21 तक्रारी प्राप्त, तीन तक्रारी निकाली   बुलडाणा , दि.3  :   लोकशाही  दिन कार्यवाहीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निरसन केल्या जाते.  या कार्यवाहीत लोकशाही दिन कक्षेत येणारे अर्ज स्वीकारण्यात येतात. अन्य अर्ज सामान्य तक्रार म्हणून घेतल्या जातात. अशा सर्व तक्रारींचा यंत्रणांनी विहीत कालावधीत निपटारा करावा,   अशा सूचना  जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज  दिल्या.     जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात लोकशाही दिन कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  त्या  बोलत हो त्या . याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अति. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे,  कार्यका...

DIO BULDANA NEWS 1.2.2020

Image
मन:शांती व तंदुरुस्त शरीरासाठी नियमीत सुर्यनमस्कार आवश्यक -     आमदार संजय गायकवाड   बुलडाणा, दि.1 :  सर्वांनी दीर्घआयुष्यासाठी दररोज सुर्यनमस्कार हा व्यायाम करावा.    तसेच व्यायामशाळेमध्ये फक्त मशिनवर व्यायाम करण्याबरोबर सुर्यनमस्कार हा व्यायाम घामाच्या धारा लागेपर्यंत करावा .  सुर्यनमस्कार या व्यायाम प्रकारामुळे वाढत्या  वयामध्ये सुध्दा शरीर यष्टी पिळदार राहते.    सुर्य नमस्कारामुळे मन व शरीर शुध्द होते, तसेच आयुष्य सकारात्मकतेने जगता येते, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.         जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक), क्रीडा भारती, आरोग्य भारती, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, विविध एकविध क्रीडा संघटना व जिल्ह्यातील सर्व योग विषयक  काम करणाऱ्या संस्था यांचे सहकार्याने    रथसप्तमी निमित्त जागतिक सुर्यनमस्कार दिन   कार्यक्रमाचे आयोजन  आज 1 फेब्रुवारी रोजी...

DIO BULDANA NEWS 31.1.2020

जागतिक सुर्यनमस्कार दिवसाचे आज आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर होणार कार्यक्रम     बुलडाणा, दि. 31 :     क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व क्रीडा भारती यांचे संयुक्त विद्यमाने, सामुहिक सुर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 7.45 ते 8.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदान येथे करण्यात येणार आहे.         जागतीक सुर्यनमस्कार दिनाचे आयोजनासंदर्भात दि.30 जानेवारी 2020 रोजी  जिजामाता प्रेक्षागार मैदानवरील कक्षात सभा पार पडली. यावेळी  जिल्हा क्रीडा अधिकारी   शेखर पाटील,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  डॉ.श्रीराम पानझाडे ,क्रीडा  भारतीचे श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ आयचीत, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे  प्रशांत लहासे, बी.डी.सावळे, सौ.अंजली परांजपे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, पी.आर.वानखडे तसेच योग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्...

DIO BULDANA NEWS 29.1.2020

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत   बुलडाणा, दि. 29 : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे.   यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपी राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.   सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.             या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.   संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह   www.mumbaidivsports.com   या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी.   ऑनलाई...

सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Image
पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात कर्जमुक्ती योजनेतून 2 लक्ष 940 पात्र शेतकऱ्यांना 140.74 कोटीचा लाभ जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी शिव भोजन थाळी सुरू अवैध गुटखा विक्रीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा निर्धार शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 40 लक्ष रूपये शिष्यवृत्तीचे वाटप बुलडाणा, दि. 26 -   जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.     भारतीय प्रजासत्ताकाचा 70 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड,  जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत,  माजी आमदार विजयराज शिंदे,  नगराध्यक्षा श्रीमती नजमुन...